# सावळज गटात राष्ट्रवादी (श. प.) प्रचाराचा जोर; आ.रोहित पाटील गटाला मतदारांचा वाढता प्रतिसाद – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

सावळज गटात राष्ट्रवादी (श. प.) प्रचाराचा जोर; आ.रोहित पाटील गटाला मतदारांचा वाढता प्रतिसाद

वायफळेत घराघरांतून संपर्क मोहिमेचा जोर, मतदारांचा कल राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)कडे

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव,रोखठोक न्यूज

तासगाव तालुक्यातील सावळज जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रचाराची गती लक्षणीयरीत्या वाढवली असून, या संघटित आणि आक्रमक प्रचाराचा थेट फायदा आमदार रोहित पाटील गटाला होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा संपूर्ण सावळज गटातील राजकीय माहोल राष्ट्रवादी (श. प.) पक्षाच्या बाजूने झुकताना दिसत आहे.

आमदार रोहित पाटील यांचे होमपीच मानल्या जाणाऱ्या या गटात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि घराघरांतून सुरू असलेल्या संपर्क मोहिमेमुळे पक्षाचा प्रचार अधिक व्यापक स्वरूप धारण करत असून, विकासकामांचा आलेख, लोकहिताच्या योजना आणि स्थानिक नेतृत्वावर असलेला विश्वास मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला जात आहे.

वायफळे (ता. तासगाव) येथे जिल्हा परिषद उमेदवार ॲड. विजय धेंडे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार पंकज उर्फ जितेंद्र झांबरे-पाटील यांच्या घर टू घर प्रचाराला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार व स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रचारास प्रारंभ करण्यात आल्याने वातावरण भावूक झाले. माजी बांधकाम सभापती साहेबराव पाटील यांनी या वेळी भावना व्यक्त करताना, अजितदादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले.

घराघरांतून करण्यात येणाऱ्या या प्रचारामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, शेतकरी, युवक व महिला हिताच्या योजनांबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. संघटित प्रचार, स्थानिक नेतृत्वाची मजबूत पकड आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षाच्या उमेदवारांना गावागावांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आमदार रोहित पाटील आणि माजी आमदार सुमनताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रचार मोहिमेमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून, सावळज जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीच्या दोन्ही गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा ठाम विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!