# दारात फटाके फोडल्याच्या कारणावरून येळावीत युवकाचा खून – रोखठोक न्युज
आपला जिल्हाक्राईम स्टोरी

दारात फटाके फोडल्याच्या कारणावरून येळावीत युवकाचा खून

दोघा भावांनी धारदार शस्त्रानी केला हल्ला ;पुर्ववैमनस्यातून कृत्य केल्याचा अंदाज, दोघांना अटक.

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव, रोखठोक न्यूज

तासगाव तालुक्यातील येळावी येथे घरासमोर फटाके फोडण्याच्या कारणावरून एका युवकांवर सख्या दोघा भावांनी धारधार शस्त्राने वार करून खून केला. याप्रकरणी संशयित दोघां भावांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दीपावली पाडव्याच्या शनिवारी रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान येळावी येथे घडली. दिपक जयसिंग सुवासे (वय – 26) असे मयत युवकाचे नाव असून संशियित विश्वजीत राजेंद्र मोहिते (वय -19) व इंद्रजीत राजेंद्र मोहिते (वय – 20) या दोघा भावांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्र ही पोलिसांनी हस्तगत केले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली हकीकत अशी की, येळावी येथील जुना धनगाव रस्त्यालगत मयत दिपक जयसिंग सुवासे यांचे व विश्वजित मोहिते आणि इंद्रजित मोहिते यांचे शेजारी शेजारी घर आहेत. सुवासे व मोहिते या दोन्ही कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून जमीन, गटारीचे पाणी दारातून जाणे या कारणांवरून वाद होता. याच वादातून अनेक वेळा वादवादीचे आणि भांडणाचे प्रकार घडले आहेत. शनिवारी दीपावली पाडव्याच्या दिवशी रात्री साडे आठच्या सुमारास इंद्रजित व विश्वजित हे दोघे रस्त्यावर फटाके फोडत होते. त्यावेळी दिपक याने ‘आमच्या घरी लहान बाळ आहे, त्याला फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होतो, तुम्ही अन्यत्र फटाके फोडा’ असे सांगण्यासाठी गेला होता. त्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. रागाच्या भरात विश्वजित व इंद्रजित यांनी दिपकवर धारधार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात दिपक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मिरज येथे दवाखान्यात दाखल कारण्यात आले. पण उपचारा दरम्यान दिपकचा मृत्यू झाला. घटनेचा तासगाव पोलिसांनी पंचनामा केला असून याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इंद्रजित मोहिते व विश्वजीत मोहिते या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एन.काबुगडे करीत आहेत.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!