# तासगांव मधील   सीसीटीव्हीबाबत “हेल्पिंग हँडस” आक्रमक – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

तासगांव मधील   सीसीटीव्हीबाबत “हेल्पिंग हँडस” आक्रमक

पोलीस निरीक्षकांना निवेदन ; आंदोलनाचा इशारा 

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगांव, रोखठोक न्यूज नेटवर्क

तासगांव येथील हेल्पिंग हँडस फौंडेशन कडून  शहरातील  बंद स्थितीत असलेले सी सी टीव्ही कॅमेरे  लवकरात लवकर सुरु करण्यात यावेत यासाठी तासगाव पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याशी चर्चा व त्यांना निवेदन दिले.
   निवेदनात म्हटले आहे की, तासगाव शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत या संदर्भात गेल्या आठवड्यात तासगाव शहरातील हेल्पिंग  हँडस् फाउंडेशन यांनी अभ्यासपूर्ण भूमिका घेऊन त्या संदर्भात तासगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  पृथ्वीराज पाटील  यांना निवेदन दिले होते. त्यांच्यात झालेल्या चर्चेनुसार आज तासगाव पोलीस निरीक्षक  सोमनाथ वाघ यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर तासगाव शहरातील सर्व कॅमेरे सुरू करण्यात यावेत अन्यथा हेल्पिंग हँडस् फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
 यावेळी,निलेश दीक्षित, विशाल शिंदे, सुशांत पैलवान, पद्माक्ष जोशी, राजू मुल्ला, सुधीर रसाळ, प्रसाद पैलवान, अथर्व जोशी, श्रीकांत गायकवाड, शुभम भाट, अनिरुद्ध सुतार, प्रशांत पाटील, आदित्य माळी, संतोष घोडके, सागर डीगे, ऋतुराज गायकवाड हे सर्वजण उपस्थित होते.
संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!