# सांगलीचे खासदार विशाल पाटील संसदेत घेणार खासदारकीची शपथ – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

सांगलीचे खासदार विशाल पाटील संसदेत घेणार खासदारकीची शपथ

Amazon.in/ONLINE SHOPPING

 

सांगली: रोखठोक न्यूज 

सांगलीचे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार विशाल प्रकाशबापू पाटील हे आज मंगळवार (दि. २५) रोजी संसद भवनमध्‍ये खासदारकीची शपथ घेणार आहेत.
वसंतदादा पाटील घराण्‍यातील ते सहावे खासदार म्‍हणून शपथ घेणारे खासदार असतील. स्‍वर्गीय वसंतदादा पाटील, श्रीमती शालिनीताई पाटील,स्‍वर्गीय प्रकाशबापू पाटील, स्‍वर्गीय मदनभाऊ पाटील, माजी केंद्रीय राज्‍यमंत्री प्रतिक पाटील त्‍यानंतर विशाल(दादा) पाटील हे खासदारकीची शपथ घेणार आहेत. सदरचा शपथविधी हा  सकाळी ११.०० वा त्‍याचे थेट प्रक्षेपण दुरदर्शनच्‍या लोकसभा व राज्‍यसभा या चॅनेलवर प्रक्षेपित होणार आहे. या शपथविधीसाठी माजी मंत्री तथा आमदार विश्‍वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, सांगली जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅंकेच्‍या उपाध्‍यक्षा जयश्रीताई पाटील, सांगली शहर जिल्‍हा कॉंग्रेसचे अध्‍यक्ष पृथ्‍वीराज पाटील, महाराष्‍ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्‍या उपाध्‍यक्षा श्रीमती शैलजाभाभी पाटील ,विशाल(दादा) पाटील यांच्‍या पत्‍नी सौ. पुजा पाटील तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!