# श्री सावळसिद्धकडून मुलींना शैक्षणिक फी साठी मदत – रोखठोक न्युज
आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

श्री सावळसिद्धकडून मुलींना शैक्षणिक फी साठी मदत

स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगांव,रोखठोक न्यूज

सावळज (ता.तासगाव ) येथील श्री. सावळसिद्ध विकास सोसायटी लि. सावळज या संस्थेतर्फे सभासदांच्या मुला मुलींना शैक्षणिक फी साठी मदत देण्यात आली. संचालक मंडळाच्या उपस्थितीत या मदतीचे चेकद्वारे वाटप करण्यात आले.

श्री सावळसिद्ध विकास सोसायटी सध्या शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. संस्थेस शंभर वर्षे पूर्ण होत आल्याने संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. संचालक मंडळांनी सभासदांसाठी सभासद कल्याण निधीची तरतूद केलेली आहे. यामधून संस्थेने यापूर्वी जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच गरीब व हुशार असलेल्या सभासदांच्या मुला-मुलींना केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये,म्हणून सभासद कल्याण निधीची तरतूद केली आहे.

सभासदातील गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांच्या मुला मुलींसाठी त्यांच्या शैक्षणिक कार्यास मदत म्हणून आर्थिक निधी वितरित केला आहे. सभासदांमधील मागणी केलेल्या एकूण 10 मुला-मुलींना प्रत्येकी तीन हजार रुपये चे वाटप त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत यावेळी करण्यात आले. यावेळी गजानन धोंडीराम पाटील, भीमराव कृष्ण पाटील, सुनील सुबराव पाटील, स्वाती संदीप माळी. दत्तात्रेय नामदेव वांडरे, आनंदा शिवाजी पाटील, अनिल जंबू माळी, माया श्रावणा सावळजकर, जयवंत विष्णू सदामते या सभासदांच्या मुला-मुलींना पैसे वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजी पाटील, संचालक दत्तात्रय पाटील, प्रदीप माळी राजेंद्र सावळजकर, सचिव निलेश रिसवडकर, गजानन पाटील, बाळासो वांडरे, सभासद व विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!