# सावळज जि.प.–पं.स. गणात राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार; मोटारसायकल रॅली, घराघरांत संपर्काने वातावरण तापलं – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

सावळज जि.प.–पं.स. गणात राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार; मोटारसायकल रॅली, घराघरांत संपर्काने वातावरण तापलं

विजय धेंडे -प्रकाश पाटील यांच्या प्रचारार्थ वडगावात शक्तिप्रदर्शन; आबा पाटलांचा बालेकिल्ला अबाधित राखण्याचा निर्धार

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव, रोखठोक न्यूज

सावळज जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील निवडणूक प्रचाराला सध्या प्रचंड वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार यंत्रणा पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून, तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सावळज जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचाराचा मोठा धुरळा उडाल्याचे स्पष्ट जाणवते.

सावळज जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विजय धांडे व सावळज पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रकाश पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव तालुक्यातील वडगाव येथे जोरदार प्रचार दौरा काढण्यात आला. या प्रचार दौऱ्यात सावळज, अंजनी, लोकरेवाडी व वडगाव परिसरातील नागरिक, महिला आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. मोठ्या संख्येने मोटारसायकल व चारचाकी वाहनांचा ताफा स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करून वडगावमध्ये दाखल झाला.

वडगावचे ग्रामदैवत ब्रह्मनाथ मंदिरात दर्शन घेऊन श्रीफळ वाढवत प्रचाराची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत विकासकामे, जनतेचे प्रश्न आणि आगामी काळातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रचाराच्या शुभारंभी माजी सरपंच रवींद्र काका पाटील म्हणाले, “सावळज जिल्हा परिषद गटातील दोन्ही उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय ही आता आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. आमदार रोहित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि भविष्यात अधिकाधिक विकासकामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले.
वडगावचे ज्येष्ठ नेते मधुकर पाटील यांनी सांगितले की, “सावळज जिल्हा परिषद गट हा स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारा ऐतिहासिक गट आहे. १९७८ पासूनचा हा बालेकिल्ला यापुढेही अबाधित ठेवण्याचा आमचा संकल्प आहे. कोणतीही शंका-कुशंका मनात न ठेवता वडगावमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्न करू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या प्रचार दौऱ्यात वडगावचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मधुकर पाटील, माजी सरपंच रवींद्र पाटील, एस. डी. पाटील, संजय जालिंदर पाटील, एस. पी. पाटील सर, मोहन कांबळे, सूर्यकांत पाटील, विशाल पाटील सर, संजय दादासो पाटील, बाबासो पाटील, संजय मच्छिंद्र पाटील, साहेबराव पाटील, श्रीरंग कांबळे, पिंटू पाटील, बबलू पाटील, विजय धुमाळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच सावळज जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य सागर पाटील, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस ताजुद्दीन तांबोळी, बी. टी. पाटील, माजी सरपंच नितीन तारळेकर, अरुण पाटील, माजी उपसरपंच बाळासाहेब पोळ, संजय थोरात, विनोद कोळी, अविनाश म्हेत्रे, सोमनाथ कांबळे, संदीप पाटील, अनिल पाटील, प्रदीप फासे, मनोज पाटील, सचिन उर्फ चिंटू पाटील, पिंटू कांबळे, आनंद धेंडे, महावीर धेंडे, शरद धेंडे, उत्तम धेंडे, माणिक माळी, रवींद्र धेंडे, जयगोंडा पाटील, संजय भोरे, बबलू घारगे, अजित पवार, सौरभ कोळी, विजय चव्हाण यांच्यासह महिला कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती होती.

एकूणच सावळज जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचाराला चांगलाच वेग मिळाला असून, बालेकिल्ला कायम राखण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या जोशातून स्पष्टपणे दिसून येत आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!