तासगाव निवडणूक २०२५ : विजया पाटील यांच्या ‘जोरदार जनसंवाद मोहीमेला’ मोठा प्रतिसाद

तासगाव :रोखठोक न्यूज
थेट नगराध्यक्षपदासाठी स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवार सौ. विजया बाबासो पाटील यांनी तासगावात सुरू केलेल्या प्रभावी जनसंवाद मोहिमेला शहरातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक प्रभागात भेट देत मतदारांशी थेट संवाद साधण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे निवडणूक रंगतदार झाली आहे.
“तासगावचा विकास हा केवळ आश्वासनांचा विषय नाही, तर जबाबदारीची शपथ आहे” असे सांगत त्या महिलांच्या प्रश्नांपासून युवकांच्या संधींपर्यंत नेमक्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत.
माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या विकासकामांचा भक्कम वारसा, महिला बचतगटांमधील त्यांचा सक्रिय सहभाग आणि शहरातील सामाजिक कार्यातील सातत्य यामुळे विजया पाटील यांच्या उमेदवारीकडे चांगला पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
तासगावातील १२ प्रभागांत वाढत चाललेला त्यांचा प्रभाव पाहता, या निवडणुकीत विजया पाटील मजबूत दावेदार ठरत असल्याची चर्चा शहरभर जोरात आहे.



